सूनावणीच्या वेळापत्रकावरुन ठाकरे सेना सर्वोच्च न्यायालयात?
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 29, 2023
- 509
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता याचिकावरील सुनावणींचा कार्यक्रम निश्चित केला असून त्याबाबत अंतिम सुनावणी 23 नोव्हेंबरनंतर घेण्याचे जाहीर केले आहे. हे सर्व सोपस्कर पार पडायला 2024 उजाडेल म्हणून शिवसेना ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर आणि अपात्र आमदारांच्या सूनावणीबाबत वेळापत्रक 18 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. या सुनावणीवेळी आम्हाला आमच्या मर्यादा पाळूदे तुम्ही तुमच्या मर्यादा पाळा असा सूचक इशारा न्यायालयाने दिल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी तातडीने सुनावणी घेण्यास सुरुवात (पान 7 वर)
केली आहे. 25 सप्टेंबर रोजी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर पार पडलेल्या सुनावणीत अध्यक्षांनी न्यायालयाच्या आदेशानुरुप सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आमदार अपात्रतेच्या संदर्भात 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे. सर्व याचिका एकत्रित करण्यावर 13 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुनावणीनंतर प्रत्येकाची सुनावणी वेगळी होणार की एकत्र होणार याबाबतचा निर्णय होणार आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या सुनावणी कार्यक्रमावरुन सुनावणी पुर्ण होऊन अंतिम निर्णयापर्यंत पोहचायला जून 2024 चा कालावधी उलटेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे ही सुनावणी एकत्र घेऊन तातडीने निर्णय घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
- सूनावणी हे फक्त सोपस्कर
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची निवड तसेच शिंदे गटाच्या प्रतोद भरत गोगावले यांची निवड यापुर्वीच बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच व्हिप काढण्याचा अधिकार हा पक्षाने निवडलेल्या व्यक्तीला असल्याने सूनील प्रभू यांचा व्हिप अंतिम असल्याचा निर्वाळा आपल्या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सूनील प्रभू यांचा व्हिप झुगारुन मतदान करणाऱ्या आमदारांची सूनावणी हे फक्त सोपस्कर पुर्ण करण्यासाठी आहे. त्यामुळे अपात्र आमदारांच्या सूनावणीसाठी एवढा कालावधी लागणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai