रस्ता यांत्रिकी सफाईच्या निविदेला उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 06, 2023
- 413
दर कमी आल्याने पालिकेची 50 कोटीहून अधिक बचत
नवी मुंबई ः नवी मुंबईतील महत्वाच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी पालिकेने मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून पालिकेने 2011 साली मागवलेल्या निविदेच्या तुलनेत यावेळचे दर खूपच कमी आल्याने 50 कोटीहून अधिक रुपयांची पालिकेची बचत झाल्याची चर्चा महापालिकेत आहे. काळजीपूर्वक व नियमांचे काटकरपणे पालन करत निविदा प्रक्रिया राबवल्याने पालिकेला स्पर्धात्मक दर प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया शहर अभियंता संजय देसाई यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
नवी मुंबई महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची सफाई करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत मे. सुमित फॅसिलिटी लि. यांची निविदा कमी दराची ठरली आहे. परिमंडळ 1 साठी 47.49 कोटी तर परिमंडळ 2 साठी 40.27 कोटींची बोली मे. सुमित फॅसिलिटी लि. यांनी लावली आहे. यापुर्वी हे काम करणाऱ्या मे.ॲण्टोनी वेस्ट हँडलींग सेल लि. यांनी परिमंडळ 1 साठी 68.16 कोटींची तर परिमंडळ 2 साठी 64 कोटींची बोली लावली. त्यामुळे कमी दर देणाऱ्या मे. सुमित फॅसिलिटी लि. चा कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत असलेल्या तरतूदींमुळे नवी मुंबई महानगरपालिका यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्याचे काम गेली 12 वर्ष करत असून त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा पालिकेचा आहे.
यापुर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने 2011 साली राबवलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक घोटाळा होवून नवी मुंबई महापालिकेला 30 कोटींचा चुना लावल्याचा ठपका स्थानिक लोकलेखा निधीच्या लेखापरिक्षकांनी ठेवून हे अतिरिक्त पैसे वसूल करण्याबाबत आक्षेप कायम ठेवले आहेत. या प्रकरणातून बोध घेऊन यावेळी शहर अभियंता व अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबवून जास्तीतजास्त स्पर्धक यात सामिल होतील अशा निविदा अटी व शर्ती ठेवल्या. यावेळी प्रथमच देशातील तीन नावजलेल्या स्पर्धकांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. मे. सुमित फॅसिलिटी लि. यांची निविदा कमी दराची आल्याने हे काम त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे. सुमित फॅसिलिटी लि. यांनी दिलेले दर हे जवळजवळ 50 कोटींनी मागिल काम करणाऱ्या मे. ॲण्टोनी वेस्ट हँडलींग सेल लि. पेक्षा कमी असून त्यामुळे पालिकेचा 50 कोटींची बचत झाल्याची चर्चा निविदा प्रक्रियेनंतर पालिकेत आहे. राजकीय हस्तक्षेप नसल्याने यावेळी जास्त स्पर्धक आल्याने हे दर प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.
- मे. सुमित फॅसिलिटी लि.चे दर कमी
परिमंडळ 1 साठी 47.49 कोटी तर परिमंडळ 2 साठी 40.27 कोटींची बोली मे. सुमित फॅसिलिटी लि. यांनी लावली आहे. यापुर्वी हे काम करणाऱ्या मे.ॲण्टोनी वेस्ट हँडलींग सेल लि. यांनी परिमंडळ 1 साठी 68.16 कोटींची तर परिमंडळ 2 साठी 64 कोटींची बोली लावली. त्यामुळे कमी दर देणाऱ्या मे. सुमित फॅसिलिटी लि. चा कंत्राट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे. सुमित फॅसिलिटी लि. यांनी दिलेले दर हे जवळजवळ 50 कोटींनी मागिल काम करणाऱ्या मे. ॲण्टोनी वेस्ट हँडलींग सेल लि. पेक्षा कमी आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai