स्वच्छता स्पर्धा सहभागाकरीता 15 डिसेंबर पर्यंत वाढ

नवी मुंबई ः पालिकेने सोसायटी, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल व प्रभाग अशा विविध पातळ्यांवर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्वच्छता स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 10 डिसेंबर ही मुदत ठेवण्यात आली होती. ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहेे. 

स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम, स्वच्छता मोहिमा यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करून स्वच्छताप्रिय वातावरण निर्मितीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. यामध्ये लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात येते.स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेत गती यावी याकरीता नागरिकांना प्रोत्साहन व यामधून प्रत्यक्ष स्वच्छता कार्याला सर्वांचा हातभार लागावा यादृष्टीने महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार सोसायटी, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल व प्रभाग अशा विविध पातळ्यांवर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्वच्छता स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 10 डिसेंबर ही मुदत ठेवण्यात आली होती. तथापि यामध्ये आणखी थोडी मुदत असावी अशा नागरिकांच्या मागणीनुसार स्पर्धा सहभाग मुदतीत 15 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात येत आहे. स्पर्धा सहभागाकरीता नागरिक / संस्था / सोसायट्या यांनी आपल्याशी संबंधीत महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात रितसर अर्ज दाखल करावयाचा आहे. एकूण 5 गटांमध्ये होणार्‍या या स्वच्छता स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.