राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा धरले धारेवर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 17, 2023
- 413
वेळापत्रक सादर करण्यास 30 ऑक्टोबरची शेवटची संधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर मंगळवारी सुनावणी पार पडली आहे. यावेळी वेळापत्रक सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. वेळापत्रकावर आम्ही समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
11 मे पासून अध्यक्षांनी काम केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे. दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झालेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्षांचे वकिल तुषार मेहता यांनी बचावाचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तुषार मेहता म्हणाले, एकट्या शिवसेनेच्या 34 याचिका आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षांना वेळ लागत आहे. आज वेळापत्रक देण अव्यवहार्य आहे. कुठलंही वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आहे, तेव्हा आपल्याला वेळापत्रक कळेल. तुषार मेहता म्हणाले की मी अध्यक्षांबरोबर बसतो आणि आम्ही एक वेळापत्रक ठरवतो. तर कोर्ट म्हणाले ही शेवटची संधी आहे, दसऱ्याच्या सुट्टीत तुम्ही बसा आणि तीस तारखेला परत आमच्याकडे 30 ऑक्टोबरला या. जर ते वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमचे वेळापत्रक देऊ. त्यानुसार आता पुढची सुनावणी 30 ऑक्टोबर होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai