सिडकोमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2023
- 228
कार्यशाळांसह विविध उपक्रमांचे आयोजन
नवी मुंबई ः केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार सिडको महामंडळामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ 30 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार 30 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीदरम्यान सिडकोमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची भ्रष्टाचाराला विरोध करा : देशासाठी समर्पित रहा ही संकल्पना आहे.
केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी देशभरातील शासकीय व निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्ये दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, समाजाच्या अशा विविध घटकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सिडकोमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाल्यानंतर राजेश पाटील यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. तसेच दक्षता सप्ताहानिमित्त राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या संदेशाचे व मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या शुभेच्छांचे वाचन त्यांनी उपस्थितांसमोर केले. तद्नंतर विलास तुपे, अपर पोलीस उपायुक्त (सेवानिवृत्त), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी ‘भ्रष्टाचार प्रतिबंध' या विषयावर कार्यशाळा घेतली.
सिडकोमध्ये दक्षता सप्ताहाच्या कालावधीत विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत भ्रष्टाचाराला विरोध करा : देशासाठी समर्पित रहा या विषयावर सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता निबंधलेखन स्पर्धा व घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा, या उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai