कांद्याची शंभरीकडे वाटचाल
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2023
- 341
घाऊकमध्ये 60 तर किरकोळ बाजारात 80 रु किलो
नवी मुंबई : सप्टेंबर पासून कांद्याच्या दराने मुसंडी मारण्यास सुरुवात केली असून शंभरी गाठणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शुक्रवार व रविवार दोन दिवस मुंबई बाजार समिती बंद असल्याचा परिणाम कांदा पुरवठ्यावरही झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये दर 60 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी कांदा मार्केटमध्ये सूमारे 300 कांद्याच्या गाड्या मार्केटमध्ये दाखल झाल्या. आता भाव वाढणार की तसेच राहणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
देशभर कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारात 20 रु. किलोने विकला जाणारा कांदा आता 60 रुपयांवर गेला आहे. रविवारी कामकाज सुरू असलेल्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 25 ते 60 रुपये किलोवर पोहोचले आहेत. मुंबई बाजार समिती शुक्रवारी कामगारांच्या संपामुळे बंद होती. रविवारी साप्ताहिक सुट्टी होती. सुट्टीचा किरकोळ मार्केटमधील पुरवठ्यावर परिणाम झाला. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, कोपरखैरणे परिसरातील किरकोळ मार्केटमध्ये कांदा 80 रुपये किलो दराने विकला जात होता. वाशी सेक्टर 17 मधील भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर 100 रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी बाजार समितीमध्ये 300 कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या. पुरेशी आवक झाली नाही तर सर्वच किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai