पालिकेत भरती प्रक्रियेची अफवा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2023
- 418
नवी मुंबई ः महाालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी यांची भरती सुरू असून तशा प्रकारच्या खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत आहेत. वास्तविकत: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.
काही व्यक्ती/संस्थांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा तसेच पालिकेचा खोटा स्टॅम्प बनवून त्याचाही वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन नवी मुंबई पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच पालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai