ग्रँड मराठा फाउंडेशनचे हजारो कुटुंबांना "दिवाळीदान"
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 23, 2023
- 504
अत्यावश्यक वस्तुंसह केले फराळाचे वाटप
मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या ग्रँड मराठा फाऊंडेशन या संस्थेने आठवडाभर दिवाळीदान मोहिमेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 4000 हून अधिक लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहचविण्यात आला. यात कपडे, स्टेशनरी, ब्लँकेट, बेडशीट, खेळणी, पिशव्या आणि फराळाचे वाटप करुन गरजू लोकांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी हातभार लावला.
राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकरवाडा, मुंबई, ठाणे, कर्जत आणि सुधागड येथे आठवडाभर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या लाभार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांचे कुटुंब, आदिवासी समुदाय आणि वंचित घटकांतील मुलांचा समावेश होता. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हा ग्रँड मराठा फाउंडेशनचा उद्देश आहे. दिवाळीदान यो मोहिमेतून संस्थेने अत्यावश्यक वस्तू पुरवून आणि दिवाळीचा आनंद पसरवून, एकता, करुणा आणि गरजूंना सामुदायिक आधार देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “ग्रँडमराठा फाऊंडेशन नेहमीच दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षणाद्वारे लक्ष्य आणि उन्नत करण्यासाठी कटिबद्ध आहे. असंख्य कुटुंबांच्या दिवाळी उत्सवात चमक आणता आल्याने समाधान मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जपून आम्ही शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.
ग्रँड मराठा फाऊंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जाते. संस्थेने विशेष लक्ष हे विदर्भावर दिले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येते. त्याचप्रमाणे कृषीपट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक क्रियाकलाप राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करून त्यांनी ई-लर्निंगला प्रोत्साहन दिले जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai