Breaking News
नवी मुंबई ः सीएसटी-पनवेल या उपनगरीय रेल्वे मार्गावर सीबीटीसी प्रणाली हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 15,909 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यातील 50 टक्के खर्च राज्य शासन उचलणार असून 50 टक्के भार पालिकेने घ्यायचा होता. त्यानंतर पालिकेकडून हिस्सा रु. 1393.55 कोटी शासनानाकडे वर्ग करणेबाबतचा ठराव पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केला असता महासभेने तो फेब्रुवारी 2019 मध्ये बहुमताने नामंजुर केला होता. हा नामंजुर ठराव अखेर शासनाने 29 नोव्हेंबर रोजी निलंबित केला आहे.
सीबीटीसी प्रणाली ही स्वयंचलित ट्रेन नियंत्रण प्रणाली आहे. रेल्वे सेवेतील ट्रफिक व्यवस्थापन व पायाभुत सुविधा नियंत्रणासाठी ही प्रणाली महत्वपुर्ण मानली जाते. सीएसटी-पनवेल या उपनगरीय रेल्वे मार्गावर सीबीटीसी प्रणाली हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 15,909 कोटी खर्च अपेक्षित आहे. यातील 50 टक्के खर्च म्हणजे रु. 7954.40 कोटी राज्य शासन उचलणार असून 50 टक्के भार पालिकेने घ्यावा असे 9 मार्च 2018 रोजी शासन निर्णयाने निश्चित केले. त्यानंतर नवी मुंबई पालिकेचा हिस्सा रु. 1393.55 कोटी शासनाकडे वर्ग करणेबाबतचा ठराव प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र सर्वसाधारण सभेने हा ठराव बहुमताने फेब्रुवारी 2019 मध्ये नामंजुर केला. मात्र महासभेने नामंजुर केलेल्या या प्रस्तावामुळे सदर प्रकल्पाचे काम बंद पडू शकते. त्यामुळे हा नामंजुर ठराव लोकहिताच्या व शासन निर्णयाच्या विरोधात असल्याने तो विखंडीत करण्याची विनंती पालिका आयुक्तांनी शासनाकडे केली होती. त्याअनुषंगाने शासनाने सदर ठराव निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर ठराव लोकहिताच्या व शासन निर्णयाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 451(1) नुसार तो शासनाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी निलंबित केला आहे. तसेच याविषयी अभिवेदन करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर सदर प्रकल्प पुर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस