जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीवर रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 09, 2023
- 256
नवी मुंबई ः दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 04 डिसेंबर रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.
समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे हा उद्देश साकारण्यासाठी संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याप्रमाणे दिव्यांग मुलांचे पालक व त्यांच्याशी संबंधित काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचाही सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून 04 डिसेंबर रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. यामध्ये नमुंमपा ईटीसी केंद्रातील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक आणि ईटीसी शिक्षक व कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभाग झाले होते. रॅलीचा प्रारंभ सकाळी 9 वाजता ईटीसी केंद्र येथून झाला व वाशी गावामध्ये पूर्ण फेरी मारून घालून या रॅलीची ईटीसी केंद्रामध्ये सकाळी 11 वाजता सांगता करण्यात आली. अशाचप्रकारे या संपूर्ण महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai