Breaking News
10 पदे कंत्राटी पद्धतीने भरणार
पनवेल ः पनवेल महापालिकेमधील 41 संवर्गातील 377 विविध पदांसाठी राज्यभरात एकाच वेळी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परिक्षेला सूरुवात झाली. पुढील चार दिवस राज्यभरातील 21 जिल्ह्यातील 57 परिक्षा केंद्रांवर ऑनलाईनपद्धतीने या परिक्षेत 55214 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दुसरीकडे वैद्यकि आरोय विभागातही 10 पदाकरीता पदभरतीची अधिसूचना पालिकेने जारी केली आहे. 11 ते 26 डिसेंबर या कालावधीत पात्र उमेदवारांनी अर्द सादर करावयाचा आहे. त्यामुळे पालिकेतील मनुष्यबळ वाढणार असून नागरिकांना उत्तम सेवासुविधा मिळणार आहेत.
पनवेल महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे आरोग्य विभागातील 10 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून 26 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 15 व्या वित्त आयोग अंतर्गत पनवेल महानगरपालिकेत रिक्त पदभरती करण्यात येणार आहे. ही पदभरती निव्वळ कंत्राटी स्वरुपात करार पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहे.
या भरतीद्वारे पनवेल महानगरपालिकेकरिता आरोग्य विभागातील स्टाफ नर्स (महिला आणि पुरुष), आरोग्य कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत पनवेल महानगर पालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून 11 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत विहित नमुन्याक अर्ज सादर करावयाचा आहे. अर्जदाराच्या गुणांकनानुसार प्रवग्रनिहाय निवड सुचीमधील पात्र उमेदवारांना त्यानच्या गुणवत्तेनुसार रिक्त पदावर त्या त्या प्रवर्गात नियुक्ता दिल्या जातीगय व उर्वरित पात्र उमेदवारांची पदनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतिक्षा याद्या ठेवण्यात येतील.
पदे आणि पदसंख्या:
पात्रता:
वेतन:
अर्ज प्रक्रिया: अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच 26 डिसेंबर 2023 च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस