तारांकित प्रश्नांनी उडवली पालिकेची झोप
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2023
- 618
पालिका आयुक्त नार्वेकर तातडीने नागपुरात दाखल
नवी मुंबई ः पालिकेच्या उद्यान विभागातील कोट्यावधींच्या घोटाळ्यासह नेरुळ येथील अनधिकृत बांधकामांवर आमदारांनी चालु हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रशासनाची झोप उडाली असून चुकीची माहिती सभागृहाला जाऊ नये म्हणून पालिका आयुक्त नार्वेकर यांनी नागपुर गाठले आहे.
गेल्या कोविड काळात नवी मुंबई महापालिकेत 8 कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळा झाल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी तीन महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता परत असाच 14 कोटी रुपयांचा उद्यान घोटाळा केल्याचा आरोप कामगार नेते मंगेश लाड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना तक्रार करुन सविस्तर चौकशीची मागणी केली होती. तसेच याविषयी राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या सोबत नेरुळ सेक्टर-16 मधील अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न आहे. नेरुळ येथील त्रिमुर्ती पार्क व कृष्णा कॉम्पलेक्स या पालिकेच्या जागेवर बांधलेल्या अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याने हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याअनुषंगाने पालिकेकडून राज्य सरकारने माहिती मागविल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, सदर माहिती घेवून स्वतः पालिका आयुक्त राजेश नार्वेकर नागपुरला रवाना झाले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा नवी मुंबईतील उद्यान घोटाळ्याने डोके वर काढल्याने यावेळी कोणत्या अधिकाऱ्याचा बळी जातो या भितीने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai