Breaking News
कमिशन देवून बदलल्या जातात 2000 च्या नोटा
नवी मुंबई ः गेल्या दोन महिन्यांपासून बेलापुर सीबीडी येथील आरबीआय बँकेसमोरही 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रोज भली मोठी लाईन लागत आहे. मात्र ही नोटा बदलण्यासाठी आलेली माणसे कमिशन बेसिसवर आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे धनदांडग्यांनी काळा पैसा वटविण्यासाठी गुलाबी रोजंदारी उद्यास आणल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यात नोटाबंदी लागू करुन चलनातील 500 आणि 1000 च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर 2000 रुपयांची नोट चलनात आणली. आता पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा 19 मे 2023 रोजी केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी 7 ऑक्टोबरंपर्यंतची मुदत देण्यात आली. या मुदतीनंतर कमर्श्ियल बँकांनी नोटा घेणे बंद केल्याने राज्यातील आरबीआय बँकेतील विविध शाखांसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 2000 रुपयांच्या 10 नोटा देवून चलनातील नोट्यांच्या स्वरुपात 20000 रुपये बँकेकडून परत मिळत आहेत. नवी मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोरही 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र ही नोटा बदलण्यासाठी आलेली मंडळी रोजंदारीवर नोटा बदलून देत असल्याचे दिसत आहे. शहरातील काही धनदांडग्यांचा काळा पैसा वटविण्यासाठी ही मंडळी रोज उन्हातानात दिवसभर उभी राहत आहे. ज्या बिल्डर, व्यावसायिक, नंबर दोनशे धंदे करणारे, राजकीय व्यक्ती अशी मंडळी की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या मात्र अचानक झालेल्या नोटबंदीमुळे त्यांना त्या बदलून घेण्यासाठी थेट जाता येत नाही. ती मंडळी अशा दलाल नागरिकांना प्रत्येक वीस हजारासाठी पाचशे ते हजार रुपये कमिशन देऊन नोटा बदलून घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुलाबी रोंजदारी करुन काळा पैसा तर वटत आहे परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाचा 2 हजाराच्या नोटा बंद करण्यामागे नेमका काय उद्देश होता हे मात्र उलगडत नाही.
काळा पैसा दडपण्यासाठी नोटांचा वापर कोण करत आहे हे समजण्यासाठी दोन हजारांच्या नोटा थेट बदलून न देता त्या जर खात्यात जमा करण्याचा नियम केला असता तर यातून काही फरनिष्पत्ती झाली असती. परंतु वर्तमानातील नोटा बदलून देण्याच्या विचार शून्य पद्धतीमुळे 2 हजाराच्या नोटेची (अप्रत्यक्ष) नोटबंदी ही केवळ नौटंकी ठरताना दिसत आहे. मनुष्यबळाचा अपव्यय आणि संशोधनाचा अपव्यय हेच या नोटा बंदीचे फलित ठरते आहे. - सुधीर दाणी- प्रवर्तक अलर्ट सिटिझन्स फोरम
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस