नवी मुंबई पालिका इतरांपेक्षा चार पावले पुढे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2023
- 394
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केली प्रशंसा
नवी मुंबई ः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देत अनुसूचित जातींकरिता नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकिय कामकाजात असलेली अधिकारी, कर्मचारी संख्या तसेच पालिकेच्या वतीने अनुसूचित जातींकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध सुविधा कामांचा तसेच कल्याणकारी योजनांचा बारकाईने आढावा घेत नवी मुंबई पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानपालिकेच्या वतीने त्यांचा स्वागतपर सन्मान केला. याप्रसंगी माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुध्दे, माजी लोकसभा सदस्य डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांचे स्वीय सचिव नवीन रोहिल्ला, जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींशी थेट संवाद साधला व अनुसूचित जातींकरिता महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामांविषयी त्यांची मते जाणून घेतली. यावेळी प्रतिनिधींमार्फत विविध सूचना करण्यात आल्या. त्या निवेदन स्वरुपात स्विकारुन महानगरपालिकेमार्फत उचित कार्यवाही करावी व अहवाल सादर करावा असे आयोगाचे सदस्य श्री. सुभाष पारधी यांच्यामार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सादरीकरण केले. त्यावर अभिप्राय व्यक्त करताना अनेक बाबींमध्ये नवी मुंबई महानगरपालिका इतरांपेक्षा चार पावले पुढे असल्याबद्दल प्रशंसा करीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी महानगरपालिकेच्या वतीने यामध्ये भर घालत अधिक चांगले काम होईल असा विश्वास व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai