अनधिकृत पानटपाऱ्यांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2023
- 408
पनवेल : खारघर व पनवेल मध्ये फूटपाथवरती, रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत पान टपाऱ्या, हातगाड्या, अनधिकृत झोपड्या,वडापावच्या दुकानांवरती खारघर प्रभाग अ कार्यालय व पनवेल प्रभाग ड कार्यालयाच्यावतीने दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिकेच्यावतीने मोठी तोडक कारवाई करण्यात आली.
खारघरमधील तळोजा फेज 2, रांजणपाडा रोड, खारघर मेट्रो स्टेशन अशा विविध ठिकाणी अनधिकृत पान टपाऱ्या, झोपड्या, वडापावची दुकाने उभारण्यात आली होती. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनूसार प्रभाग समिती अ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी अतिक्रमण विभागाच्यासाह्याने तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तामध्ये दिनांक 27 डिसेंबर तोडक कारवाई केली. यावेळी जेसीबी, डम्परच्या साहाय्याने अनधिकृत 17 पान टपाऱ्या,3 वडापाव दुकाने,3 हातगाड्या, 4 झोपड्या तोडण्यात आल्या.
याचबरोबर प्रभाग ड चे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी प्रभाग समिती ‘ड'च्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने 28 डिसेंबर रोजी ठाणा नाका, गार्डन हॉटेल परिसर, स्वामी नित्यानंद मार्ग, महापालिका मुख्यालय , नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ, पनवेल बस स्थानकाबाहेर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये 10 अनधिकृत उभारलेल्या पान टपऱ्या, 2 झोपड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली होती. संध्याकाळी पाच नंतरही ही कारवाई सुरूच होती.मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या साहाय्याने ही तोडक कारवाई करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai