जागतिक पर्यटनस्थळ घारापुरी टंचाईग्रस्त
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2023
- 320
बेटावर बोटीने पाणीपुरवठ्याची मागणी
उरण : युनोस्कोच्या जागतिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या घारापुरी बेटावर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे. त्यामुळे बेटावर पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याचा फटका येथील तिन्ही गावातील नागरिकांसह, देशी परदेशी पर्यटकांनाही बसणार आहे. यावर उपाययोजना म्हणून बोटीने पाणीपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
यावर्षी अपुऱ्या व कमी पावसामुळे घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी बेटावर धरण आहे. या धरणाची पाणी पातळी डिसेंबर महिन्यातच खालावली आहे. परिणामी जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. घारापुरीमधील काळ्या पाषाणातील कोरीव लेण्या पाहण्यासाठी मुंबईतून दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्याोग आहेत. या सर्वांना पाणीपुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरविले जाते.
- पत्राद्वारे मागणी
घारापुरी बेट असल्याने टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. ग्रामपंचायतीकडेही पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, उरण गटविकास अधिकारी, उरण तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai