वाशीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2024
- 541
काल्याचे किर्तन, मिरवणूक व महाप्रसादाने ज्ञानयज्ञाची सांगता
नवी मुंबई : वाशीत श्रीदत्त जयंती निमित्त सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व अध्यात्मिक ज्ञानयज्ञ सोहळ्याची बुधवार 27 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी काल्याचे किर्तन झाल्यानंतर सेक्टर 15 येथील परिसरामध्ये 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
20 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत वाशी सेक्टर 15 येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये शहरातील भाविक भक्त हरिनाम संकीर्तनात रंगून गेले. श्रीदत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूक सोहळ्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संजीव नाईक, संदीप नाईक, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, विजय वाळुंज, अजय वाळुंज, राजू शिंदे, सतीश रामाने, सिंधुताई नाईक, अरविंद नाईक, सचिन नाईक, आणि शंकर शेठ पिंगळे, गामी ग्रुपचे प्रवर्तक सुरेश भाई तसेच विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री दत्तगुरु धर्मादाय ट्रस्टच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तगुरु असोसिएशन, दत्तगुरु गणेशोत्सव मंडळ, दत्तगुरु महिला मंडळ तसेच वारकरी भाविक भक्तांचे सहकार्य लाभले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai