दहा हजार विद्यार्थ्यांना मिळणार मध्यान्ह भोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2024
- 383
अक्षय पात्र फाउंडेशन मार्फत पौष्टिक अन्न पुरवणार
पनवेल : शालेय मुलांना माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या अक्षय पत्र फाउंडेशनच्या राज्यातील चौथ्या मध्यवर्ती स्वयंपाक घराचा शुभारंभ राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे शासनाच्या शालेय आहार उपक्रमाअंतर्गत पनवेलमधील 70 शाळांमधील दहा हजार मुलांना दुपारचे गरमागरम जेवण मिळणार आहे.
मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी, त्यांना योग्य आहार मिळावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारकडून मध्यान्न भोजन योजना राबवली जाते. याकरिता शासनाकडून तांदूळ आणि अनुदान पुरवले जाते. तसेच या अंतर्गत महापालिका, नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून खिचडी शिजवली जाते. पण अनेक ठिकाणी या भोजनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 70 शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार असे जेवण मिळावे म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अक्षय पात्र फाउंडेशन मार्फत पौष्टिक अन्न दिले जाणार आहे. पनवेल महापालिकेने साईनगर येथे वीस हजार चौरस फुटाची जागा पंधरा वर्षाच्या करारावर या संस्थेला उपलब्ध करून दिली आहे. तसेच आठ कोटी रुपयांचा खर्च करून अत्याधुनिक स्वरूपाचे मध्यवर्ती किचन अक्षय पात्र फाउंडेशनने उभारले आहे. या ठिकाणी दहा हजार विद्यार्थ्यांकरता मध्यान्ह भोजन तयार केले जाणार आहे.
- दर्जेदार, पौष्टिक आहारावर भर
भाताबरोबरच विविध प्रकारच्या डाळींपासून बनवलेले वरण, छोले, सांबर, रवा, लापशी या शिवाय इतर वेगवेगळे पदार्थ असलेले मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले जाते. एका विद्यार्थ्याला एकूण 13 रुपये इतका खर्च आहे. - केंद्र व राज्य सरकारकडून मध्यान्ह भोजन योजने करिता तांदूळ आणि सहा रुपये इतके अनुदान दिले जाते. उरलेले सात रुपये अक्षय पात्र फाउंडेशन खर्च करीत आहे. सीएसआर फंडातून हा खर्च भागवला जात आहे.
- या सुविधेचा पालिका आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच अक्षय पात्र फाउंडेशनच्या सेंटर किचन पूर्णपणे हायजेनिक असल्याने मुलांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळणार आहे.
महाराष्ट्रात आगळी-वेगळी शिक्षण व्यवस्था उभी करायची आहे. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून नवीन शिक्षण पद्धती अमलात आणत आहोत. त्यात अक्षय पात्र संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. - दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai