कोपरखैरणेमध्ये सिग्नलला दुपारची विश्रांती
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2024
- 333
वाहतुकीचा बोजवारा बनली नित्याचीच बाब
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील काही ट्राफिक सिग्नल दररोज काही काळ बंद असतात. सिग्नलची ही दुपारची विश्रांती नित्याचीच बाब बनली असून या वेळेत वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या या कारभाराविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे
वाशी-कोपरखैरणे मार्ग हा अतिरहदारीचा मानला जातो. या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून चौकाचौकांमध्ये सिग्नस बसवले आहेत. मात्र, कोपरखैरणेतील डी-मार्ट जवळील तसेच तीन टाकी जवळील सिग्नल दुपारच्या वेळेत काही काळ बंद असतात. सकाळ-संध्याकाळच्या तुलनेत दुपारी वाहनांची वर्दळ काहीशी मंदावलेली असली तरी सिग्नलची ही दुपारची विश्रांती मुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा मात्र नक्की उडतो. सिग्नल यंत्रणेला न जुमानणारे काही चारचाकी वाहनचालक व दुचाकीस्वार जास्त असून दुपारच्या कालावधीमध्ये वाहने सुसाट दामटवतात. इतर वाहनांची किंवा पादचाऱ्यांची तमा न बाळगता वाहने हाकल्याने चक्काजामला सामोरे जावे लागते. सिग्नल यंत्रणा सुरू राहिल्यास वाहतुक बऱ्याच अंशी सुरळीत राहते. परंतु नित्याची बाब बनलेल्या या 'दुपारची सिग्नल विश्रांती'ला काय कारण असावे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
- कमी रहदारी असल्याने बंद असतो सिग्नल?
दुपारच्या वेळेत कमी रहदारी असल्यामुळे सिग्नल बंद असतात. नागरिकांचा वेळ वाचावा या उद्देशाने हे सिग्नल दुपारच्या वेळेत बंद असतात, अशी प्राथमिक माहिती समजते. संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai