निकालाबाबत ईडी सरकार निश्चिंत
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 09, 2024
- 454
राज्यभर दौऱ्यांचा सपाटा; निकाल आपल्याच बाजुने लागण्याचा दावा
मुंबई ः आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या (10 जानेवारी) आपला निकाल जाहीर करणार आहेत. सर्व राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचे या निकालाकडे लक्ष लागले असले तरी ‘इडी' सरकार मात्र याविषयी निश्चिंत असल्याचे दिसून येते. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर राहणार, असा विश्वास फडणवीस व्यक्त करत असून मेरीटप्रमाणे निकाल लागून आम्हाला दिलासा मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. राज्यभरात त्यांनी शासकीय कार्यक्रमासाठी दौऱ्यांचा सपाटा लावल्याने ‘इडी' सरकार आपल्याच बाजुने निकाला लागेल यावर ठाम असल्याचे दिसत आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडून झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा निकाल आहे. राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. परंतु, राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अपत्रातेप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या गटाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. अध्यक्षांकडे सुनावणी झाली, त्याचा निकाल आता लागेल. पण मी एवढंच सांगतो, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेतही बहुमत आहे, लोकसभेतही बहुमत आहे. निवडणूक आयोगानंही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे निकाल मिळायला हवा असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही कोणत्याही प्रकारे नियम सोडून काम केलेलं नाही. हे सरकार नियमाने स्थापन झालेलं आहे. त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्या राहुल नार्वेकर काय निर्णय देतायत याची उत्सुकता राज्यातील जनतेला असली तरी राज्यभर विविध योजनांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दौरे सुरु आहेत. आजही त्यांनी गडचिरोली, नागपुर येथे दौऱ्यावर जाऊन शासकीय योजनांचा शुभारंभ केला. त्यामुळे उद्याच्या निकालाची चिंता नसून तो आपल्याच बाजुने लागणार असल्याचा ठाम विश्वास असल्याने त्यांचे दौरे सुरुच असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांत सुरु आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai