दिघा स्थानकात अखेर थांबा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 13, 2024
- 358
नवी मुंबई ः गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील काही महिन्यांपासून हे स्थानक तयार झाले होते. मात्र, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उदघाट झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले आहे. पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानकासाठी 428 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथं आयटी कंपन्याही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.
- उद्घाटनात मानपमान नाट्य
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचे नाव दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात यावे आणि सुरू व्हावे यासाठी विचारे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांसह दिघा रेल्वे स्थानकात हजेरी लावली. त्यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. - (एमयूटीपी-2 योजनेंतर्गत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा भाग)
- ठळक वैशिष्ट्ये : किंमत : 90 कोटी रुपये (अंदाजे), स्थान : ठाणे ते ऐरोली उपनगरीय स्थानकांदरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर, प्लॅटफॉर्म : 2 आयलंड प्लॅटफॉर्म.
- फायदे : ठाणे आणि ऐरोलीपासून जवळ- (ठाण्यापासून 3.2 किमी आणि ऐरोलीपासून 2.6 किमी), प्रवासी सुविधांमध्ये 6 एस्केलेटर, 2 लिफ्ट, एक दिव्यांग अनुकूल बुकिंग काउंटरसह तिकीट बुकिंग कार्यालयांचा समावेश आहे. स्थानकात पुरेशी आसन व्यवस्था, पार्किंग सुविधा, टॉयलेट ब्लॉक, वॉटर फाउंटन, साइनेज बोर्ड आणि विस्तृत परिसंचरण क्षेत्र आहे. ज्या हजारो प्रवाशांना सध्या ठाणे किंवा ऐरोली स्थानकाचा वापर ट्रेनमध्ये चढण्यासाठी/उतरण्यासाठी करावा लागतो,अशा हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहेयाचा आयटी क्षेत्रातील कर्मचारी, स्थानिक लोक आणि विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai