‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 19, 2024
- 522
नवी मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.
कोकण विभगातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने ... व ... तसेच ://. या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार(राष्ट्रस्तरीय)
1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10. समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार
शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai