Breaking News
पनवेल : खारघर येथे 4 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आठवड्याभराच्या या सोहळ्यासाठी देशातील तीन पीठांचे आचार्य, शंकराचार्य, संतांचे वंशज, वारकरी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचा दावा आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्थेने केला आहे. या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती, हरिकीर्तन, पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक, टाळकरी, तीन हजार मृदंग वादक आणि हजारो श्रोतृवृंद उपस्थित राहणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai