Breaking News
पनवेल : भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या इको चालकाने तीन मुलांना चिरडल्याची घटना दि.4 रोजी कामोठ्यात घडली. या घटनेत आर्यन रोकडे हा पाच वर्षांचा कचरावेचक मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरा वेचक महिला अंजली साळवे (24) या कामोठे गावामध्ये कचरा वेचून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.4 रोजी अंजली या स्वतः पती दत्ता व 3 मुलांसह काम झाल्यानंतर मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्याबरोबर घरी जाणेसाठी थांबले असतांना जुईगाव गेट्कडुन जुईगावाकडे जाणारी ईको स्कुल व्हॅन चालकाने आर्यन रोकडे, मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांना पाठीमागुन जोरात ठोकर माँरून गाडी पुढे लाईटच्या खांबाला जावुन धडकवली. स्कुल बसकडे जात असतांना चालक गाडी सोडून पळुन गेला. सदर ईको स्कूल बस क्र. एमएच 43 बीबी 3418 या क्रमांकाच्या इको चालकाने दिलेल्या धडकेने जखमी झालेल्या आर्यन, मंगल व नधिया यांना बाहेर काढुन एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचाराठी दाखल केले. एमजीएम हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी यावेळी आर्यन रोकडे (9) यास मृत्य घोषित केले. तर मंगल बाळु रोकडे व नधिया प्रदिप साळवे यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी व्हॅन चालक कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न देता पळून गेल्याने त्याच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai