Breaking News
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार चिंध्रण, म्हाळुंगी आणि कानपोली या गावांच्या जमिनींवर केला जाणार असून मागील दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने या नव्या औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन केले. त्यानंतर या औद्योगिक वसाहतीचे काम कधी सुरू होणार याकडे उद्योजकांचे लक्ष लागले होते. जानेवारीत याबाबतची निविदा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रसिद्ध केली होती. मात्र या निविदेतील तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा मंगळवारी याबाबतची शुद्धीकरणासहीत फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली. नव्या निविदेनुसार एमआयडीसी या वसाहतीच्या निर्माणासाठी 483 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च करणार आहे. राज्य सरकारचे उद्योगस्नेही धोरण आहे. औद्योगिक वसाहतींना जमीन कमी पडू लागल्याने सरकारने पुढाकार घेऊन तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी नियोजन केले. नव्या विस्तारीत एमआयडीसीसाठी चिंध्रण, कानपोली आणि म्हाळुंगी या गावांची निवड करून या गावांचे भूसंपादन करण्यात आले. तब्बल 257 हेक्टर जमिनीवर नवी औद्योगिक वसाहत वसली जाणार आहे. या नव्या वसाहतीमध्ये चिंध्रण, कानपोली आणि म्हाळुंगी गावातील प्रकल्पग्रस्तांना वाणिज्य वापरासाठी भूखंड मिळणार आहेत.
तसेच रोजगार या परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या नव्या एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखाने आणि माहिती तंत्रज्ञाचे उद्याोग उभे राहणार आहेत. राज्य सरकारचे उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी जुन्या औद्योगिक वसाहतीच्या निर्माणामध्ये ज्या चुका प्रशासनाकडून झाल्या त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशस्त रस्ते, वाहनतळ, कामगार रुग्णालय, अग्निशमन दलाचे केंद्र आणि वाहनतळासाठी विशेष जागेचे नियोजन करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उद्याोगमंत्र्यांच्या सूचनेनंतर नवी औद्योगिक वसाहतीच्या निर्माणाला वेग आला आहे. मंगळवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या 483 कोटी 40 लाख रुपयांच्या निविदेमध्ये स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
या पायाभूत सुविधांची कामे होणार
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai