शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश नको
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 427
राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात निर्णय मागे घेण्याची मागणी
नवी मुंबई : खारघर येथे संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वारकरी संप्रदाया तर्फे महत्वाचे ठराव मांडण्यात आलेत. नद्या प्रदूषण मुक्त करा, शाळा पोषण आहारात अंड्यांचा समावेश बंद करा अशा मागण्या वारकरी संप्रदाय तर्फे करण्यात आल्या आहेत.
खारघर येथे संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित आयोजित केलेले राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. यावेळी काही मागण्या शासन दरबारी ठेवण्यात आल्या. शहरांच्या लगत असलेल्या अनेक औद्योगिक वसाहत मधून प्रदूषित रासायनिक पदार्थ थेट नदीत सोडले जातात त्याच बरोबर शहरातील नद्या या कचरा कुंड्या बनल्या आहेत. त्यामुळे सदर नद्या खास करून तीर्थ क्षेत्रा जवळील नद्या प्रदूषणमुक्त कराव्यात, तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी आणावी आणि राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे असे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत. या निर्णयांची सकारात्मक अंमलबजावणी न झाल्यास वारकरी संप्रदाय उग्र रूप धरण करुन सरकारला जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी दिली. यावेळी शालेय पोषक आहारातील अंड्यांचा समावेश बंद कारण्याबाबत आग्रही असल्याचे सांगण्यात आले. यावर अंमलबजावणी झाली नाही तर सरकारला नक्कीच जागा दाखवू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai