Breaking News
मनोज जरांगेंच्या तीन मागण्या
जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीबाबत मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांशी याबाबत चर्चा केली आहे. यावेळी तीन प्रमुख मागण्यांवर एकमत झाले आहे. त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य कराव्यात असे देखील यावेळी ठराव घेण्यात आला.
1. महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. त्यासाठी सर्व कुणबी नोंदी शोधण्यात यावे. नोंदी सापडलेल्या त्यांच्या सर्व परिवाराला त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची अमंलबजावणी करण्यात यावी. असे न करता आल्यास महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अध्यादेश काढण्यात यावे.
2. मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे विना अट मागे घेण्यात यावे.
3. हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि स्वीकारण्यात यावे. सोबत 1881 चे गॅझेट,1901 ची जनगणना घ्यावी, बॉम्बे गॅझेट आणि सातारा संस्थानचे गॅझेट स्वीकारावे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai