Breaking News
पनवेल : बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष व गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे पंढरीशेठ फडके यांचे हद््यविकाराच्या झटक्याने आज निधन झालेे. त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके. त्यांचे आज निधन झाले आहे. 1986 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी राखून ठेवली होती. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं रुग्णालयात निधन झाले. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत असली तरी त्याला विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. पंढरी फडके यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे. तसेच सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे जवळचे संबंध होते. अडल्या नडल्यांना मदत करणे ही त्यांची आवड होती. त्यामुळे अनेकांचा पोशिंदा गेल्याचे दुःख तालुक्याला झाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai