Breaking News
3991 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प; महिला सशक्तीकरणासाठी 225 कोटी 50 लाख
पनवेल ः सन 2023-24 चे सुधारित व 2024-25 चे मुळ 3991 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवार 24 रोजी सादर केले. कोणतीही कर वाढ, दर वाढ नसलेल्या या अर्थसंकल्प महिला सशक्तीकरणावर भर दिला आहे. महिलांच्या सशक्तीकरणावरती भर देणाऱ्या या अंदाजपत्रकामध्ये महिला व बालविकास योजनांसाठी 225 कोटी 50 लाख इतकी रक्कम अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आली आहे.
यंदाच्या 3991 कोटींच्या अर्थसंकल्पात 1258 कोटी आरंभीची शिल्लकिचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मनपा कर 1411 कोटी युडीसीपीआर व विकास शुल्क अंतर्गत वसुली 101 कोटी, जीएसटी अनुदान 470 कोटी तसेच करेतर महसूल शास्ती व शुल्कचे 197 कोटींच्या जमेच्या बाजूंचा समावेश आहे. पालिकेची 1230 कोटींची ठेवी हि जमेची बाजू आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प आरोग्यावर (पान 7 वर)
भर देणारा होता त्यादृष्टीने शहरात नव्याने 15 नागरी आरोग्य, रात्री सुरु होणारे आपला दवाखाना या व्यतिरिक्त कळंबोली याठिकाणी कार्यान्वित होत असलेले 72 बेडेड हॉस्पिटल तसेच माता बाळ रुग्णालयाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai