Breaking News
पनवेल : राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला दि.1 पासून सुरुवात झाली आहे. 26 मार्च पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला पनवेल तालुक्यातुन एकुण 13 हजार 668 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.एकूण 20 केंद्रावर हि परीक्षा होत आहे. राज्यात 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षा सुरु झाल्याने शुक्रवारी सकाळी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यी तसेच त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणुन परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता अर्धा तास आगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत कॉपी सारखे प्रकार टाळण्यासाठी एक भरारी पथक देखील विविध केंद्रावर लक्ष ठेवणार आहे. बारावीची परीक्षा देखील सुरु असल्याने 12058 विद्यार्थी पनवेल तालुक्यातून बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. 13 केंद्रावर हि परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडतील म्हणून सर्व परीक्षा केंद्रप्रमुखाना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यात 13668 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एस.आर.मोहिते यांनी दिली. पनवेल तालुक्यात कळंबोली सुधागड हायस्कुल आणि पनवेल मधील व्ही के हायस्कुल याठिकाणी तालुक्याच्या दोन कस्टडी आहेत. याठिकाणाहून तालुक्यातील 20 परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित होत असतात. या कस्टडीवर पोलिसांचा 24 तास पहारा असतो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai