14 गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2024
- 413
मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला निर्णय; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे अखेर पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यासंबंधी निर्णय जाहीर केला आहे. दीड वर्षांपूर्वी याची अधिसूचना निघून देखील अंतिम निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता होती. अखेर निकाल लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे यासाठी सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मार्च 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती, त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचना जारी होऊन दीड वर्ष उलटले तरी याचा निकाल लावला जात नव्हता. वर्षा निवासस्थानी कल्याण डोबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील 14 गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. या बैठकीत 27 गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील 27 गावातील नागरिकांना 2017 च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला. त्याचा जीआर, नोटिफिकेशन देखील यावेळी काढण्यात आले आहे. आणि 14 गाव नवी मुबंई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहे.
- मालमत्ता कराचा प्रश्न मार्गी
या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. - समाविष्ट करावयाची गावे
दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बाम्मली, नारीवली, बाळे, नागांव, भंडार्ली, उत्तर शीव, गोठेघर,
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai