अटल सेतूवरून कोकण भवन ते मंत्रालय बेस्ट सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 459
खारघर : अटल सेतूवरून कोकण भवन ते मंत्रालयदरम्यान बेस्ट प्रशासनाकडून गुरुवारपासून (ता. 14) बससेवा सुरू केली आहे. सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या दरात नवी मुंबई ते मुंबई प्रवास केवळ 20 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
अटल सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई प्रवास केवळ 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे; मात्र यासाठी प्रवासी-वाहनचालकांना 250 रुपये पथकर मोजावा लागत आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने या मार्गावर बेस्ट बससेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात होती. अखेर बेस्ट प्रशासनाने अटल सेतूवरून सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या दरात गुरुवारपासून बस क्रमांक 145 ही बस सेवा सुरू केली आहे. ही वातानुकुलीत बस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र मंत्रालय, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स, पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतू उड्डाणंपूल, उलवे नोड, किल्ले गावठाण, बामन डोंगरी रेल्वे स्थानक, कोकण भवन सीबीडी बेलापूर या मार्गांवर धावणार आहे.
- तिकिट दर (रुपयांत)
किमान 50, कमाल 226 - बसची वेळ
कोकण भवन येथून सकाळी 7.30 आणि 8 वाजता; तर सायंकाळी 530ः आणि 6 या वेळेत बस सुरू राहणार आहेत. सोमवार ते शनिवारदरम्यान ही बससेवा उपलब्ध असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai