आंबा निर्यातीसाठी मार्केट 24 तास खुले
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 420
नवी मुंबई ः आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये 41 निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी 24 तास मार्केट खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आंबाविक्रीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोकणच्या हापूससह गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व केरळवरून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी 300 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल आंबा हंगामामध्ये होत असते. येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते. बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये 41 निर्यातदारांची कार्यालये आहेत. बाजार समितीने स्वतंत्र निर्यातभवन इमारतही बांधली आहे. आंबा हंगामामध्ये निर्यातीसाठी 24 तास मार्केट खुले केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यामधील निर्यातक्षम आंब्याची निवड, पॅकिंग व इतर प्रक्रिया पुर्ण करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत. आंबा घेवून येणारी वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये येण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. गेट क्रमांक 3 मधून फक्त आंबा घेवून येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मार्केटमध्ये स्वच्छतेपासून इतर सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. मार्केटमधून सद्यस्थितीमध्ये 8 ते 10 हजार पेट्यांची नियमित निर्यात सुरू आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी 34 हजार 557 पेट्यांची आवक झाली असून यामध्ये 26,220 पेट्या कोकण व 8,337 पेट्यांची आवक इतर राज्यांमधून झाली आहे. पुढील आठवड्यात आवक अजून वाढण्याचा अंदाज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai