19 एप्रिलपासून सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणुक
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 462
मुंबई : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. तब्बल 97 कोटी मतदार या देशातील केंद्र सरकार ठरवतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे. 24 जून रोजी मुदत संपत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजीव कुमार पुढे म्हणाले की, “आमच्याकडे 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, जे काही खंडांच्या एकत्रित मतदारांपेक्षा जास्त आहेत. 10.5 लाख मतदान केंद्रे, 1.5 कोटी मतदान अधिकारी, सुरक्षा अधिकारी. 55 लाखांहून अधिक ईव्हीएम, 4 लाख वाहने असतील.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार
- पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
- दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
- तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11)
- चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11)
- पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13)
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुरुष मतदारांपेक्षा महिला अधिक
देशभरातील मतदारांमध्ये लिंग गुणोत्तर 948 आहे आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी सज्ज
85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी आणि देशभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे.
सर्व 10.48 लाख मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान सुविधा असणार
मतदारसंघ मतदान कधी
- नंदुरबार 13 मे
- धुळे 20 मे
- जळगाव 13 मे
- रावेर 13 मे
- बुलडाणा 26 एप्रिल
- अकोला 26 एप्रिल
- अमरावती 26 एप्रिल
- वर्धा 26 एप्रिल
- रामटेक 19 एप्रिल
- नागपूर 19 एप्रिल
- भंडारा-गोंदिया 19 एप्रिल
- गडचिरोली-चिमूर 19 एप्रिल
- चंद्रपूर 19 एप्रिल
- यवतमाळ - वाशिम 26 एप्रिल
- हिंगोली 26 एप्रिल
- नांदेड 26 एप्रिल
- परभणी 26 एप्रिल
- जालना 13 मे
- औरंगाबाद 13 मे
- दिंडोरी 20 मे
- नाशिक 20 मे
- पालघर 20 मे
- भिवंडी 20 मे
- कल्याण 20 मे
- ठाणे 20 मे
- मुंबई-उत्तर 20 मे
- मुंबई - उत्तर पश्चिम 20 मे
- मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) 20 मे
- मुंबई उत्तर मध्य 20 मे
- मुंबई दक्षिण मध्य 20 मे
- दक्षिण मुंबई 20 मे
- रायगड 7 मे
- मावळ 13 मे
- पुणे 13 मे
- बारामती 7 मे
- शिरुर 13 मे
- अहमदनगर 13 मे
- शिर्डी 13 मे
- बीड 13 मे
- सातारा 7 मे
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7 मे
- कोल्हापूर 7 मे
- हातकणंगले 7 मे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai