देशभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2024
- 451
नवी मुंबई पालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे
नवी मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार देशभरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुुंबई पालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला ज्या अधिकाऱ्यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम केलं असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारनं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. महाराष्ट्रासह देशभरात जवळपास अशीच स्थिती होती. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बदल्यांच्या मुद्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यांना निवडणूक आयोगानं पदावरुन हटवलं होतं. निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र सरकारनं इकबाल चहल, आश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. अखेर आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महापालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची आता सहकार आणि निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी कैलाश शिंदे यांची वर्णी लागली आहे. अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तिथून त्यांची बदली आता मुंबई महापालिकेत अतिरिक्ति आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर ठाण्याच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती केली आहे. मेट्रो वुमेन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होत्या. त्यांच्या जागी आता अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai