युटीएस ॲपमध्ये बदल
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 27, 2024
- 315
प्लॅटफॉर्मवरही तिकिट काढता येणार
मुंबई : रेल्वेने युटीएस ॲपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना रांगेत उभं न राहताही प्लॅटफॉर्मवरच लोकलचे तिकिट काढता येणार आहे. रेल्वेने केलेल्या या बदलामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वेने हा बदल केला आहे.
भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे. साधारणतः मोठ्या स्थानकांत तिकिटघरांत तिकिटांसाठी मोठी रांग लागलेली असते. प्रवाशांना तिकिट काढणे सोप्प व्हावे, यासाठी रेल्वेने युटीएस ॲपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं लोक आरामात तिकिट काढू शकणार आहेत. रेल्वेने अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटीएस ॲप डेव्हलप केले आहे. जेणेकरुन रांगेत उभं न राहताना जनरल तिकिट आणि प्लॅटफॉर्म तिकिट काढता येऊ शकणार आहेत. प्रवासी महिन्याचा पासदेखील काढू शकतात. मात्र, सुरुवातीला तिकिट काढण्यासाठी काही मर्यादा होत्या. रेल्वे रूळांपासून 20 मीटर दूर असतानाच तिकिट काढू शकता यायचे. मात्र, आता रेल्वेने ही मर्यादा शून्य केली आहे. रेल्वेने युटीएस ॲपवर तिकिट काढण्यासाठी संपूर्ण देशातील रेल्वे रूळांसाठी जिओ फेसिंग केली आहे. कारण लोक ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीला बघून तिकिट काढू शकतात. त्यामुळं रेल्वे रूळांपासून 20 किमी अंतरावर असताना ॲपमधून तिकिट काढण्याची मर्यादा होती. मात्र आता त्यात बदल करुन ही मर्यादा शून्य केली आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही तुम्ही तिकिट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला स्थानकाच्या बाहेर जावं लागणार नाही.
युटीएस ॲपमधून तिकिट काढताना दोन पर्याय आहेत. पहिला पेपरलेस म्हणजेच ॲपमधूनच तुम्ही टीटीला तिकिट दाखवू शकता. तर, दुसरा पर्याय प्रिंटेड तिकिट त्यासाठी तुम्हाला ॲपमधून रेल्वे स्थानकात लावलेल्या ऑटोमॅटिक वेंडिग तिकिटमधून पेपर तिकिट प्रिंट करु शकतात. मुंबईसारख्या शहरांसाठी युटिएसमधील हा बदल मोठा दिलासादायक ठरणार आहे. हजारो लोक या ॲपवर अवलंबून आहेत. सध्या 25 टक्के लोक युटिस ॲपवरुन तिकिट घेतात. आता या बदलामुळं युटिएस ॲपचा वापर आणखी वाढणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai