विकासकाला करारनाम्यात पार्किंगचा तपशील द्यावा लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 27, 2024
- 356
महारेराने काढले पार्किंग नियमाचे परिपत्रक
मुंबई ः बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागे अभावी पार्किंगची समस्या निर्माण होते. काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत देतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) ने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार बिल्डरने करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक असणार आहे.
महरेराच्या नियमांनुसार, बिल्डर ओपन पार्किंग स्पेसची विक्री करु शकत नाही. तसंच, पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन वाद-विवाद होणार नाहीत यासाठी रेराने ओपन पार्किंग स्पेसमध्ये मार्किंग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सोसायटीच्या कोणत्या भागात किती गाड्या पार्क होणार, याची माहिती बिल्डरने देणे आवश्यक आहे. डिसेंबर 2022मध्ये रेराने तीन नियम बनवले होते. ज्यात कोणताही बदल करायचा असेल तर बिल्डरला महारेराची परवानगी घ्यावी लागणार आहे. आता यात पार्किंगसंदर्भातील चौथा नियमही जोडण्यात आला आहे. अनेकदा बिल्डर बिल्डिंगच्या बीमजवळची जागा पार्किंग म्हणून विक्री करत होते. मात्र, या बीममुळं व अपुऱ्या जागेमुळं कार पार्क करण्यास अडचणी येत होत्या. ओपन पार्किंगमध्येही कार पार्क करण्यावरुन वाद-विवाद होत होते. भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून नवे परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच बिल्डरला लिखित स्वरुपात पार्किंगची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये पार्किंगच्या जागेचा तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी, पार्किंगचे इमारतीतील ठिकाण, या सगळ्याचा उल्लेख असणे बंधनकारक असणार आहे. सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या वाटप पत्रात आणि विक्री करारांमध्येच पार्किंगचा तपशील असलेले जोडपत्र देणे बंधनकारक असणार आहे.
महारेराने या पूर्वी 30 जुलै 2021 रोजी परिपत्रक जारी करत पार्किंगच्या अनुषंगाने सूचना जारी केल्या होत्या. यात खुला पार्किंग एरिया हा चटई क्षेत्रात मोजला जात नसल्यामुळं विकासक त्यासाठी पैसे आकारु शकत नाही. त्याशिवाय गॅरेज, अच्छादित पार्किंग याबाबतही परिपत्रकात स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही बिल्डरांकडून याविषयी खबरदारी घेतली जात नसल्याने अखेर महारेराला पुन्हा एकदा परिपत्रक काढावे लागले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai