राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 257 गुन्हे
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 27, 2024
- 410
256 आरोपीना अटक; 71 लाख 86 हजार 841 किंमतीचा मुद्देमाल जप्त
रायगड : लोकसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने केलेल्या कारवाईत रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.16 मार्च ते दि.22 एप्रिल 2024 पर्यत एकूण 257 गुन्हे नोंदविण्यात आले असून 256 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आर.आर.कोले यांनी सांगितले. संपूर्ण कारवाईमध्ये 1 लाख 12 हजार 872 लिटर दारु व 13 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 71 लाख 86 हजार 841 आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 145 गुन्हे नोंद करण्यात येवून 45 लाख 39 हजार 415 रुपये किंमतीचा मुद्देमाल व मावळ मतदारसंघात एकूण 112 गुन्हे नोंद करण्यात आले असून रुपये 26 लाख 47 हजार 426 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 149 खाली एकूण 596 संशयित व सराईत गुन्हेगारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अंतर्गत एकूण 221 प्रस्ताव लोकसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून पैकी 123 कलम-93 अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्यामुळे रायगड जिल्हयात एकूण 10 मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील आदेश होईपर्यत निलंबित करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुक-2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथक तैनात असून पथकांस आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार याकरीता रायगड जिल्हयात शेडूंग, ता-खालापूर, खारपाडा, ता-पेण व चांदवे, ता.पोलादपूर येथे 3 तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल,टप-या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. तसेच सदर निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून गोवानिर्मित मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रो-रो सेवेव्दारे वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्दारे येणाऱ्या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.
रायगड जिल्हयात लोकसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आले आहे.
- 32 रायगड मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मदय निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस अँप क्र.8422001133 व टोल फ्री क्र.18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दुरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन सर्व नागरीकांना करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai