ऐरोलीत पालिकेचे वाहनतळ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 08, 2020
- 599
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पार्किंग सुविधेचा बोजवारा उडाला असून, वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने ठिकठिकाणी पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऐरोली सेक्टर-5 मधील आरक्षित भूखंडावर महापालिका वाहनतळ उभारणार असून, यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या भूखंडासमोरील बाजूस नाट्यगृह प्रस्तावित असून, मागील बाजूस मंगल कार्यालय व मार्केट परिसर आहे. त्यामुळे या भागात होणारी बेकायदा पार्किंग तसेच भविष्यात वाहनांची वाढणारी वर्दळ यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका या ठिकाणी वाहनतळ विकसित करणार आहे. हे वाहनतळ उभारण्यास महापालिकेला सुमारे दोन कोटी 19 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai