डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- May 18, 2024
- 461
नवी मुंबई ः 16 मे 2024 रोजीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने यावर्षीचे घोषवाक्य "समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा" जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डेंग्यूविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग घेऊन डेंग्यू आजारास प्रतिबंध करणे हे राष्ट्रीय डेंग्यु दिनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनी अर्थात 16 मे रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामे वा झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 16 ते 21 मे 2024 या कालावधीत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व खाजगी प्रयोगशाळा प्रमुख यांची प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांना हिवताप, डेंग्यू, साथरोग, जलजन्यरोग याबाबत संबोधित करण्यात येणार आहे. याच 16 ते 21 मे कालावधीत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगारांच्या सभा घेऊन फवारणी काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. 21 मे 2024 रोजी मुख्यालयातील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डेंग्यू आजाराची लक्षणे म्हणजे - एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे अशा प्रकारची असून अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे आत्यंतिक गरजेचे आहे.
डेंग्यू आजार रोखण्यासाठी - आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करावीत, घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, झाकण नसल्यास कापडाने झाकावे, घराच्या परिसरातील अडगळीचे सहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात व झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, गॅलेरीत / छतावर पाणी साठेल असे भंगार सामान ठेवू नये, गळके नळ आणि पाईपलाईन वेळीच दुरुस्त करावी, कोणाताही ताप अंगावर काढू नये अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai