आरोप-प्रत्यारोपाने प्रचाराची सांगता
- by Aajchi Navi Mumbai
- May 18, 2024
- 408
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत शुक्रवारी झालेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रचारसभेत दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करुन प्रचाराची सांगता केली.
इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, व्होट जिहाद वाल्यांना ती संपत्ती देण्याचं काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
शिवाजी पार्क मैदानात गर्व से कहो हम हिंदू ही डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली आहे. उबाठाला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे, मतांसाठी लाचारी सुरू झाली आहे. इतक्या जलदगतीने रंग बदलणारा सरडा पाहिला नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र
नरेंद्र मोदी होते म्हणून राम मंदिर बनू शकलं. पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती स्थापन करावी. - राज ठाकरे, मनसे प्रमुख
जेलचे उत्तर व्होटने द्यायचे. मी झोळी पसरवून तुमच्याकडे भीक मागायला आलोय या देशाला वाचवायला. हा देश आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. वन नेशन वन लीडरसाठी ते काम करत आहेत. त्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा होऊ देणार नाही. दहा वर्ष ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला पाहिजे. मला संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही. - उध्दव ठाकरे, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे गट
राज्यातील सामान्य माणूस उद्धव ठाकरेंमागे उभा आहे. तुम्ही माझ्यावर टीका केली, महाराष्ट्रात कुणीतरी भटकता आत्मा असल्याचे बोलला. एवढंच सांगतो की, हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यासाठी जे करावं लागेल, ते करण्याची तयारी आहे - शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्रराव पवार गट
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai