सकाळी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- May 20, 2024
- 323
नवी मुंबई : ठाणे जिल्हा लोकसभा निवडणूक मतदान सुरु झाले असून अनेक ठिकाणी मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारी कडक उन असल्याने सकाळच्या सत्रात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.
नवी मुंबईत अनेक ठिकाणच्या मतदार केंद्रावर सकाळी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी अति तीव्र उन्हाच्या झळा लागत असल्याने सकाळी सकाळी मतदान करावे या हेतूने अनेक जण आले होते. ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण 25 लाख 8 हजार 71 मतदार असून त्यात महिला 11 लाख 59 हजार दोन आणि पुरुष मतदार 13 लाख 48 हजार 163 मतदार असून या शिवाय 207 तृतीयपंथी तर 700 सेवा मतदार आहेत.
नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघापैकी ऐरोलीत 4 लाख 57 हजार 611 एकूण मतदार असून त्यात 2 लक्ष 57 हजार 611 पुरुष तर 1 लाख 99 हजार 715 महिला मतदार आहेत याशिवाय 130 तृतीयपंथी आणि 155 सेवा मतदार आहेत. तर बेलापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 97 हजार 855 एकूण मतदार असून 2 लाख 12 हजार 896 पुरुष तर 1 लाख 84 हजार 817 महिला मतदार आहेत. 18 तृतीयपंथी आणि 124 सेवा मतदार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai