राज्यसेवा पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला
- by Aajchi Navi Mumbai
- May 30, 2024
- 368
मुंबई : राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता दिनांक 08 मे, 2024 च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2024/प्र.क्र.137/आरक्षण-05, दिनांक 28 मे, 2024 अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा () दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai