डान्स बार, पबवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 30, 2024
- 393
अनधिकृत बांधकामासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बडगा
नवी मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अनेक बेकायदा पब आणि बार वर कडक कारवाई करण्यात आली असून देशभर हे प्रकरण तापले आहे. याच अनुषंगाने आपल्याही शहरात असे होऊ नये म्हणून बुधवार आणि गुरुवारच्या रात्री नवी मुंबई मनपा, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे 10 डान्सबार, 5 पब, लिकर बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.
राज्यातील मुख्य शहरांमध्ये पब संस्कृती बळावत आहे. रात्रभर अनेक बार पब हुक्का पार्लर सुरु असतात हे उघड सत्य असून त्यावर अधून मधून कारवाई केली जाते. मात्र पुण्यातील किसननगर अपघात प्रकरणानंतर पुण्यात अनेक बार पब कारवाईच्या कचाट्यात अडकल्या. याच अनुषंगाने नवी मुंबईतही अचानक मात्र नियोजनबद्ध रित्या रात्रभर पब लेडीज बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ. राहुल देठे यांनी सांगितले कि वाशी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी येथील 10 डान्सबार, 5 पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, परवानगी पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. या कारवाईपोटी रु. 1 लाख इतकी दंडात्मक वसूली करण्यात आली. यावेळी पब, डान्स बार मधील नियमबाह्य बांधकामही तोडण्यात आली आहेत. यासह नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai