मेगाब्लॉकने चाकरमान्यांचे जम्बो हाल
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2024
- 421
मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होणार असून, तिन्ही दिवशी एकूण 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार असून, या दिवशी शक्यतो नोकरदारांना वर्क फ्रॉर्म होम करू देण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने कार्यालयांना केली आहे.
सीएसएमटी येथे 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात म्हणून फलाट क्रमांक 10 आणि 11 चा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पुर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्सप्रेस रद्द तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून, आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज 1 हजार 810 लोकल फेऱ्या धावतात. मात्र आता तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण 930 लोकल फे-या रद्द होणार असल्याने प्रवाशांची अतोनात हाल होणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर तिन्ही दिवशी एकूण 930 लोकल फेऱ्या रद्द होतील. या काळात लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी कार्यालयांना कर्मचाऱ्यांना या काळात वर्क फ्रॉर्म होम करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही कार्यालयांना केली आहे. जेणेकरून या काळात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी फलाट क्रमांक 10 व 11 चा विस्तार केला जात आहे. 1 जूनच्या मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून 2 जूनच्या दुपारी 12.30 पर्यंत यासाठी ब्लॉक घेतला जाईल. त्यात आता यात ठाणे येथील फलाटाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai