मुंबईत ठाकरेंचे पारडे जड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 04, 2024
- 457
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून मुंबईतून ठाकरेंचे पारडे जड झाले आहे. मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.
मुंबईतील सहा मतदारसंघात अटीतटीची लढत निर्माण झाली आहे. कारण, चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. त्यातही मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, इशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण या सहा मतदारसंघांमध्ये थेट ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना अशी लढत आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाकरे गटाचे मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील विजयी झाले आहेत.
- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना 1 लाख 40 हजार 878 मते मिळाली असून शिंदे गटाचे रविंद्र वायकर अवघ्या 1 हजार मतांनी मागे आहेत.
- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना मागे पाडलं आहे. संजय पाटील यांना 1 लाख 72 हजार 914 मते आतापर्यंत मिळाली असून मिहिर कोटेचा 3 हजार 125 मतांनी मागे आहेत.
- मुंबई दक्षिण विभागातून अरविंद सावंत यांना 1 लाख 25 हजार 598 मते मिळाली असून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव 36 हजार 028 मतांनी मागे आहेत.
- तर, दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना 1 लाख 99 हजार 77 मते मिळाली असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार 15 हजार मतांनी मागे आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai