ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेचा बोलबाला
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 04, 2024
- 368
नवी मुंबई ः शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याच सेना-विरुद्ध-सेना अशी लढत झाली. ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांच्यात काटे की टक्कर झाली. मात्र म्हस्के यांनी मुसंडी मारत ठाणेदार होण्याचा मान पटकावला आहे. 1.50 लाख एवढ्या भारी मताधिक्याने म्हस्के यांचा दणदणीत विजय झाला आहे. कल्याण डॉ श्रीकांत शिंदे आणि ठाणे येथे नरेश म्हस्के यांच्या निर्णायक आघाडीने या प्रतिष्ठित निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली असल्याने नवी मुंबईत शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे.
नरेश म्हस्के यांचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज संध्याकाळी 7: 00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर 18 नेरुळ विजय माने यांच्या कार्यालया समोर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे साहेब, शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख, किशोर पाटकर साहेब,आरपीआय नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे साहेब,भाजपाचे अध्यक्ष रामचंद्र घरत , महानगर प्रमुख अशोक गावडे , महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील इत्यादी उपस्थित राहणार आहेत. याचप्रमाणे वाशी येथेही भाजपच्या कार्यर्त्यांसमवेत विजय साजरा करण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील यशाबद्दलही विविध राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
कल्याणमधून श्रीकांत शिंदेंचा दणदणीत विजय
कल्याण ः ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 39 हजार 966 मते पडली तर मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना 2 लाख 34 हजार 488 मते पडली. या मतदारसंघात जवळपास 2 लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून येते. आज निकालात श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी 2 लाखांच्यावर पोहचली. दरम्यान, एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार, 60.29 टक्के मते श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली तर वैशाली दरेकर यांना 32.17 टक्के मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही शाहबुद्दीन शेख सुलेमानी यांना तिकीट दिले होते. त्यांना 15 हजार 460 मते पडली.
- ठाणे लोकसभा
- नरेश म्हस्के : 292372
- राजन विचारे : 190559
- लीड : 101813 (नरेश म्हस्के)
- कल्याण लोकसभा
- श्रीकांत शिंदे : 249514
- वैशाली दरेकर : 127038
- लीड : 122476(श्रीकांत शिंदे)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai