माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यास दिरंगाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 417
पनवेल ः पनवेेल महापालिकेने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून सामान्य कर माफी जाहीर केली होती. परंतु वर्ष उलटले तरी याबाबतची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने न केल्याने माजी सैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही अंमलबजावणी होण्यासाठी गेली वर्षभर माजी सैनिक पालिका मुख्यालयात खेटे मारत आहेत. मात्र पालिकेकडून कर माफी देण्यास दिरंगाई होत असल्याने कधी मिळणार करमाफी असा प्रश्न अडीच हजार माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे.
पालिका प्रशासनाने माजी सैनिकांची थट्टा करत या महत्वपूर्ण शासन निर्णयाची अंमलबजावणी का केली नाही असा प्रश्न संतापलेले माजी सैनिक गुरुवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर विचारत होते. गुरुवारी पनवेलच्या माजी सैनिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी पालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ पालिकेत उपलब्ध नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. माजी सैनिकांना आदर देऊन यापूर्वी तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेतर्फे विविध कार्यक्रमात मानाचे स्थान दिले होते. मात्र सध्याचे पालिका प्रशासन माजी सैनिकांसाठी दिलेली सवलत जाहीर करत नसल्याने सैनिकांची थट्टा केली जात असल्याची भावना यावेळी माजी सैनिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विजय जगताप, समीर दुंदरेकर, दत्तात्रय चव्हाण यांनी व्यक्त केली.
पनवेल महापालिका परिसरात राहणाऱ्य़ा माजी सैनिकांना यापुढे मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सवलत देण्याबाबतचा निर्णय पनवेल पालिकेने घेतला होता. यामुळे पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना मोठा कर दिलासा मिळणार होता. “माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी या योजनेमार्फत हा निर्णय पनवेल पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला होता. संबंधित करसवलत 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आल्याचे पालिकेने त्यावेळेस प्रसारमाध्यामांसमोर स्पष्ट केले होते. यापूर्वी पालिका क्षेत्रातील माजी सैनिकांना सामान्य करामध्ये 8 टक्क्यांची सवलत होती. माजी सैनिकांना 1 एप्रिल 2023 पासून सामान्य कर पूर्ण माफ करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. ज्या माजी सैनिकांनी 1 एप्रिल 2023 ते 1 ऑगस्ट 2023 यादरम्यानचा मालमत्ता कराचा भरणा केला होता, त्यांचा सामान्य करात भरणा केलेली रक्कम पुढील वर्षाच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये समायोजित करण्यात येईल असेही पालिकेने त्यावेळेस जाहीर केले होते. संबंधित सवलतीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांनी 14 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai