राहणीमान सुलभता निर्देशांकासाठी प्रतिसाद द्या

पालिकेचे नागरिकांना आवाहन

नवी मुंबई ः केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील मोठ्या शहरांमधील राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने शहरांचे परीक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये, जीवनमान गुणवत्ता, आर्थिक क्षमता, सेवांमधील सातत्य या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणात पाणी, वीज, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, निवास सुविधा, सुरक्षा, पर्यावरण, मनोरंजन, शिक्षण, वाहतूक, राहणीमान स्तर, हरित जागांची उपलब्धता अशा विविध निकषांवर आधारित सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 परीक्षणातही नागरिक प्रतिसादाला महत्त्व देण्यात आले असून, त्याला 100 पैकी 30 गुण आहेत. 29 फेब्रुवारीपर्यंत नागरिक आपला नवी मुंबई शहराविषयीचा अभिप्राय नोंदवू शकतात. 

नवी मुंबई शहराचे नागरिक म्हणून शहराविषयी असलेले प्रेम आणि अभिमान येथील नागरिकांच्या प्रत्येक समाजपयोगी उपक्रमांतील व्यापक स्वरूपातील सहभागातून नेहमीच प्रदर्शित होत असल्याचे दिसून येत असून, नवी मुंबई शहर अधिकाधिक उत्तम होण्याकरिता येथील नागरिक जागरूक असतात. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 परीक्षणातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराविषयीच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे नोंदवावीत व नवी मुंबई शहराला देशात अग्रणी बनविण्यासाठी योगदान द्यावे, त्याचप्रमाणे आपल्या फेसबुक व ट्विटरवरील प्रतिक्रियांसोबत शेवटी चूउळींूचूझीळवश हा हॅशटॅग जोडावा, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.