पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या कामाला गती
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 435
सर्वाधिक लांब वावर्ले बोगद्याचे काम पुर्ण
नवी मुंबई : पनवेल येथून लोकलने कर्जतला जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. वावर्ले बोगदा जून अखेरपर्यंत तयार होणार होता. मात्र, मुंबई रेल्वे विकास महामंडळच्या काटेकोर नियोजनामुळे बोगद्याचे काम मुदतीआधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या कामाला आणखी गती येणार आहे. लवकरच मुंबईतील चाकरमान्यांना लोकल ट्रेनने पनवेल मार्गे कर्जतला लवकर पोहोचणे सहजशवय होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळने (एम.आर.व्ही.सी.) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-3 (एमयुटीपी-3) अंतर्गत पनवेल ते कर्जत अशा दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पनवेल-कर्जत दरम्यान एकच रेल्वे मार्गिका असून त्यावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुक होत आहे. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्लाला वळसा घालून प्रवास करावा लागतो. जर पनवेल-कर्जत अशी थेट लोकल सुरु झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो. लोकल ट्रेन सुरु झाल्यास त्याचा अनेक प्रवाशांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काही वर्षांत पनवेल ते कर्जत या मार्गावर लोकल धावणार आहे.
वावर्ले बोगद्याचे मुख्य काम पूर्ण झाल्याने बोगद्यात इतर सुविधा उभारण्याचे काम एम.आर.व्ही.सी.तर्फे हाती घेण्यात आले आहे. वावर्ले बोगदा खणण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. सध्या ठाणे-दिवा मार्गावर पारसिक बोगदा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबाची रेल्वे बोगदा आहे. मात्र, आता वावर्ले बोगदा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai